nagpuri santra bajar : देशांतर्गत बाजारात नागपुरी संत्रा खातोय भाव

nagpuri santra bajar : देशांतर्गत बाजारात नागपुरी संत्रा खातोय भाव

Orange Market: सध्या बाजारात संत्रा फळांचे दर दर्जानुसार प्रति टन २० ते ३५ हजार रुपयांवर टिकून असल्याची माहिती मोर्शी येथील संत्रा प्रक्रिया उद्योजक नवीनकुमार पेठे यांनी दिली.

संततधार पावसामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत संत्रापट्ट्यात मोठ्या प्रमाणावर फळगळती झाली. त्यामुळे सध्या बाजारात संत्रा फळांचे दर दर्जानुसार प्रति टन २० ते ३५ हजार रुपयांवर टिकून असल्याची माहिती मोर्शी येथील संत्रा प्रक्रिया उद्योजक नवीनकुमार पेठे यांनी दिली.

संत्रा उत्पादक आंबिया आणि मृग बहरातील फळांचे उत्पादन घेतात. त्यानुसार आंबिया बहरातील फळे सप्टेंबरपासून उपलब्ध होतात. सरासरी ३० डिसेंबरपर्यंत या हंगामातील फळांची उपलब्धता होते. सुरुवातीच्या काळात तापामानातील वाढ आणि त्यानंतर पावसाची संततधार अशा नैसर्गिक आपत्तीच्या परिणामी संत्रापट्ट्यात मोठ्या प्रमाणावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला.

यातूनच फळगळतीच्या समस्येला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. अमरावती जिल्ह्यात नागपुरी संत्र्याखालील सर्वाधिक एक लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यामुळे या भागातील बागायतदारांना नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला. उत्पादकता घटल्याने त्याचा परिणाम हंगामाच्या सुरुवातीला दरातील तेजीच्या माध्यमातून दिसून आला. आंबिया बहरातील फळांना सुरुवातीच्या काळात ६४ हजार रुपये प्रति टन असा उच्चांकी दर मिळाला. यापुढील काळात देखील हाच दर टिकून राहील, अशी अपेक्षा बागायतदारांना होती.

मात्र त्यानंतर हे दर कमी होत ५५, ५० आणि त्यानंतर ४०, ३५ हजार रुपये टन आणि आता थेट ३२ हजार रुपये टनांवर पोहोचले आहेत. उच्चांकी दर मिळणाऱ्या फळांमध्ये चांगल्या प्रतीच्या फळांचा समावेश आहे, असे श्री. पेठे सांगतात. यापूर्वी हंगामात अपवादात्मक स्थितीतच संत्रा फळांना ३० हजार रुपयांपेक्षा अधिकचा दर मिळाल्याची पुष्टी त्यांनी केली. गेल्या काही वर्षांत १८ ते २२ हजार रुपये टन या दरानेच संत्र्याचे व्यवहार होत होते.

फळांची उपलब्धता कमी, दरात सुधारणा संततधार पावसामुळे झाडांची मुळे बराचवेळ पाण्यात राहिली. परिणामी, त्यांच्या अन्नद्रव्य घेण्याच्या कार्यावर परिणाम झाला. त्याबरोबरच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे त्याच्याही परिणामी संत्रापट्ट्यात मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली. त्यामुळे यंदा हंगामात फळांची उपलब्धता कमी आहे. त्याच्याच परिणामी दरात काहीशी सुधारणा अनुभवली जात आहे.

हे पण वाचा : रोजचे कांदा बाजारभाव पहा

Leave a Comment